Pages

"नमस्कार, मी अविनाश अशोक पाटील, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा शिराळेखुर्द ता. शिराळा जि. सांगली आपले माझ्या "ध्यास गुणवत्तेचा " ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे Welcome..........!!!"

माझे उपक्रम

शैक्षणिक उपक्रम
१. डिजिटल स्कूल:
माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न करावा. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेतात. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकतांना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागते.
२. इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेतात. टिपणी काढतात त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण होते.
३. परिसर भेट:
मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी द्याव्या. माहिती घेतात त्यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावते. उदा. न्यायालय, आठवडे बाजार, तुरुंग, पोलीस स्टेशन, वीट भट्ट्या, सुतारनेट, शेती, किरण, दुकान, पिठाची गिरणी, बँका, शेती सेवा केंद्र इत्यादी.
४. पर्यावरण संवर्धन:
विद्यार्थ्यांनी गाव परिसरात झाडे लावावीत. त्याचे संगोपनही तेच करतील.
दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मुले झाडांना राख्या बांधून त्यांचे एका अर्थाने पालकत्व स्वीकारत असतात.
५. हस्तलिखित:
दरवर्षी "माझी पुस्तिका" नावाचे हस्तलिखित शाळेच्या वतीने तयार करावे. या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या भाषा प्रकारात लिहितात. ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांची भाषा ते प्रमाणभाषा तसेच कुटुंब ओ शाळा यांना जोडणारा सेतू म्हणून या उपक्रमाचे आगळे महत्त्व आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी कमी बोलतात. लिहिताना कसेबसे लिहितात. लेखनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होता यावे म्हणून प्रमाणभाषा तसेच व्याकरण याला फाटा देऊन विद्यार्थी मुक्तपणे लिहितात.
६. शेतीची अवजारे:
पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा शाळेत संग्रह केलेला आहे. त्या अवजारांची नावे, त्यांचे उपयोग, हे अवजारे वापरल्याने होणारे फायदे विद्यार्थी सांगतात.
७. फिल्म डे:
विविध भाषांतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट शाळेत दाखवावे. त्यावर चर्चा करावी. विद्यार्थी आपली मते मांडतात. मनोरंजनातून शिक्षण हा यामागील उद्देश आहेच याशिवाय एखाद्या गोष्टीची चिकित्सा करण्याचा वस्तुपाठ म्हणजे हा उपक्रम होय.
८. स्वच्छता दिवस:
आठवड्याच्या एका दिवशी शक्यतोवर शनीवारला विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता तपासावी. आदिवासी विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयीच्या बाबतीत कधी-कधी दुर्लक्ष करीत. परंतु स्वच्छता दिवस या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात यावे. त्यामुळे स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. दर शनीवारला विद्यार्थ्यांकडून शाळेत कडूनिंबाच्या काडीने दात घासून घ्यावे.
९. जंगलवाचन:
विद्यार्थ्यांना परिसरातील जंगलाची सहल घडविताना प्रत्यक्ष अनुभूतीने शिक्षण दिले जाते. झाडे, वेळी, फुले, पशु-पक्षी, डोंगर- दऱ्या, या विषयाची माहिती स्थानिक माहितगार लोक विद्यार्थ्यांना सांगतात.
१०. वाचन संस्कार:
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम राबवावे. परिपाठात श्यामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे प्रकट वाचन घ्यावे. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी गटागटाने बसून चर्चा करतात.
११. कात्रण संग्रह:
विद्यार्थी वर्तमानपत्रे वाचतात. त्यातील विविध विषयांवरील बातम्या, छायाचित्रे, यांची कात्रणे काढतात. ती वहीत डकवतात. ऑलिंपिक, पंढरीची वारी, संगणक, जलोत्सव, बोधकथा, खेळ आदी विषयावर आधारित कात्रण संग्रह विद्यार्थ्यांनी केले आहेत.
१२. शब्दाची बाग :
शाळेसमोरील पडक्या वाड्याच्या भिंतीवरील दगडांना निरनिराळे रंग देऊन त्यावर इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील शब्द लिहितात. त्यात धरणांची, जिल्ह्यांची, किल्ल्यांची, संतांची, वर्तमानपात्रांची नावे, जोडाक्षरे लिहावीत. त्यातून मुले भाषिक खेळ व प्रश्नमंजुषा खेळतात. वाचन तसेच सामान्य ज्ञान या बाबी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
१३. हस्ताक्षर सुधार प्रकल्प:
विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होतो. देवनागरी लिपीतील मुळाक्षरे योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी विशेष मार्गदर्शन करावे व सराव घ्यावा.
१४. छंदवर्ग:
नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, पाठांतर, रांगोळी, रंगभरण, वाचन, भटकंती, निरीक्षण आदि छंदांची जोपासना व्हावी यासाठी शाळेत छंद व आवड हा उपक्रम घ्यावा.

No comments:

Post a Comment